रेवणसिद्ध गुरुसिद्ध कोरे यांनी अवघ्या ४० दिवसांत कलिंगडाचं तीन लाख ६० हजारांचं उत्पन्न घेतलं आहे.
कोरवली येथे कोरे यांची सहा एकर शेतजमीन आहे. याच क्षेत्रावर त्यांनी अनेक पिकांचे वेगवेगळे प्रयोग केले आणि ते यशस्वीही झाले आहेत.

कोरे यांनी एक एकर पाच गुंठ्यात कलिंगडाच्या पिकाचं उत्पन्न घेतलं. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली.
![]() |
सोलापुरच्या शेतकऱ्याचं कर्तृत्व,४० दिवसांत ३, ६०, ००० रूपयांचं उत्पन्न |

कोरे यांनी एक एकर पाच गुंठ्यात कलिंगडाच्या पिकाचं उत्पन्न घेतलं. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली.

शेतीची मशागत करून कोरे यांनी एकरी दोन ट्रॉली म्हणजेच २० टन शेणखत टाकले.
त्यानंतर ६ फूट अंतराचे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरुण ठिबक सिंचन केले़ त्यानंतर दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप याप्रमाणे ६ हजार रोपांची लागवड केली.

८ ते १० दिवसांच्या अंतराने खतांची मात्रा, योग्य वेळी पाणी आणि रासायनिक खते व औषधांची मात्रा दिली. त्यामुळे केवळ दोन महिन्यातच कलिंगड बाजारात विक्रीसाठी आले.कोरे यांनी स्थानिक बाजारपेठ निवडण्याऐवजी थेट गुजरातच्या बाजारापेठेत कलिंगड विक्रीसाठी पाठविले.
- त्या ठिकाणी विक्रीसाठी जाण्यास खर्च जास्त होत असला तरी जास्त दर मिळत आहे. शिवाय हे कलिंगड गुजरातमधील नागरिक चवीने खातात.लिंगड हे कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. ते घेण्यात यशस्वी झाल्याचे रेवणसिद्ध कोरे यांनी सांगितले.कोरे यांनी कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेतल्यामुळे त्यांचा सत्कारही कऱण्यात आला.
0 comments:
Post a Comment
Please add comment