करोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.
गुरुवारी सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १७०० पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सुद्धा ५०० अंकांची घसरण झाली आहे.
मार्च २०१८ नंतर पहिल्यांदाच निफ्टी १० हजाराच्या खाली आला आहे. ४० हजारापर्यंत पोहोचलेल्या सेन्सेक्समध्ये ३३ हजारापर्यंत घसरण झाली आहे. आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घातले आहे. सौदी अरेबिया आणि रशियात तेल दरावरुन युद्ध सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण झाली आहे. सेन्सेक्सची पडझड होण्यामागे ही सुद्धा दोन प्रमुख कारणे आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment