![]() |
LockdownIndia | ‘पेटीएम’द्वारेगॅस सिलिंडर सहज बुक करणं शक्य |
घरगुती गॅस सिलिंडर आता पेटीएमवरुनही बुक करता येणार आहे. लॉकडाउनदरम्यान घरगुती गॅसचा तुटवडा जाणवू नये आणि गॅस सिलिंडर सहज बुक करणं शक्य व्हावं, म्हणून पेटीएमने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी पेटीएमने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत (IOCL)भागीदारी केली आहे.
पेटीएमने इंडियन ऑइलसोबत भागीदारी केल्याने ग्राहकांना आता घरगुती गॅस सिलिंडर पेटीएमवरुन बुक करता येईल. याशिवाय आयओसीएलचे घरपोच सिलिंडर पोहोचवणारे कर्मचारीही आता सिलिंडर पोहोचवताना डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देण्यासाठी पेटीएम ऑल-इन-वन अँड्रॉइड पीओएस डिव्हाइस (Paytm All-in-One Android POS) आणि ऑल-इन-वन क्यूआर कोड (All-in-One QR) सोबत ठेवतील. याशिवाय या मशिन्स इंडियन ऑइलच्या सर्व कार्यालयांमध्येही वापरासाठी ठेवल्या जातील. कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी आणि ग्राहकांना लॉकडाउनमध्ये सिलिंडर सहज बुक करणं शक्य व्हावं म्हणून ही भागीदारी करण्यात आली आहे.
पेटीएमवर गॅस सिलेंडर कसा बुक करता येईल?
-सर्वप्रथम पेटीएम अॅप अपडेट करा, जर अपडेटचा पर्याय नसेल आता तर अॅप ओपन करा.
-अॅप ओपन केल्यानंतर Other Options च्या पर्यायावर जा
-किंवा पेटीएमच्या सर्च ओप्शनमध्ये Cylinder असे सर्च करा
-त्यानंतर तुम्हाला Book a cylinder असा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करुन तुम्ही दिलेली प्रक्रिया फॉलो केल्यास घरबसल्या सिलिंडर बुक होईल.
0 comments:
Post a Comment
Please add comment