महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात पाच जणांना करोनाची बाधा झाल्याचं समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर बुधवारी मुंबईतही दोन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू असतानाच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्येही करोना विषाणूनं पाऊल ठेवलं आहे. अमेरिकेहून परतलेल्या एकाला करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
चीनमधील वुहान शहरात उद्रेक झालेल्या करोना विषाणूमुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जगातील अनेक देशांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांची वाढत चालली आहे. भारतातही करोना आजारानं शिरकाव केला असून, महाराष्ट्रातही करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहेत. बुधवारीपर्यंत (११मार्च) महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १० होती. त्यानंतर नागपूरमध्ये आणखी एक करोनाग्रस्त रुग्ण सापडला आहे.
पाच दिवसांपूर्वी नागपूरला एक व्यक्ती अमेरिकेहून परतली. त्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. नागपूरमध्ये ११ जणांना करोना सदृश्य लक्षण आढळून होती. त्याचे नमुने घेतल्यानंतर प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. ११ पैकी नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. तर दोघांचे बाकी होते. यात पाच दिवसांपूर्वी अमेरिकेहून परतलेल्या रुग्णांचा अहवाल बुधवारी सांयकाळी आला. त्यात त्याला करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं.
नाशिकमध्ये दाम्पत्याला करोनाचा संसर्ग?
राज्यात करोना सदृश्य आजाराची लक्षण आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. यात नाशिकमध्ये दोन करोनाग्रस्त संशयित रुग्ण आढळून आल्याचं वृत्त आहे. एका दाम्पत्यामध्ये करोनाची लक्षण दिसून आली. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नाशिक जिल्हा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment