![]() |
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल |
पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेतील कनिष्ठ अभियंता महिलेस अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आपल्या प्रभागातील कामाचं श्रेय इतर नगरसेवकांनी घेतल्याचं हे प्रकरण आहे. 16 मार्च रोजी ही घटना घडली असून 18 मार्च रोजी गुन्ह्याची नोंद झाली आहे.
जावेद शेख यांनी संबंधित 25 वर्षीय महिलेस स्वतःच्या कार्यालयात फोन करुन बोलावून घेतले आणि प्रभागातील विकास कामांवरुन अश्लील शिवीगाळ सुरु केली. "कामाचा पाठपुरावा मी करायचा आणि श्रेय दुसरे नगरसेवक कसे काय घेऊन जातात. मी आजवर 40 ते 50 गुन्हे केले आहेत. तू माझं काहीही करु शकत नाहीस. मी साईटवर आल्याशिवाय एक वीटही हलली तरी मी तुमच्याकडे बघून घेईन," अशी धमकी शेखने दिल्याचा महिलेने आरोप केला आहे. यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग आणि धमकीचा गुन्हा निगडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या पाहा
संबंधित बातम्या पाहा
0 comments:
Post a Comment
Please add comment