मुकेश अंबानींचे 9333 कोटींचे नुकसान! |
भारतीय शेअर बाजारात अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे मोठी घसरण झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
युद्धाच्या सावटाची झळ देशातील उद्योगपतींना देखील बसली आहे. युद्धयजन्य परिस्थितीतीमुळे रिलायन्स इंटस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना 9333 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही एकाच दिवसात सुमारे 136 कोटी रुपये गमावले.
भारताच्या अनेक दिग्गज उद्योजक-व्यापाऱ्यांच्या खासगी संपत्तीतही यामुळे जबरदस्त घसरण झाली.
गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील घसरणीमुळे एकूण 2.97 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
आशियातील सर्व प्रमुख बाजारात घसरण पाहायला मिळाली. टोकिओच्या निक्केई 225, दक्षिण कोरियाच्या कोस्पी आणि S&P ASX 200 मध्ये घसरण झालेली दिसली.
0 comments:
Post a Comment
Please add comment