राज्यात पुन्हा पाऊस बरसणार .



येत्या 2-3 दिवसांमध्ये मध्यम ते किरकोळ पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

भारतीय हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात किमान तापमानात घट होत असली तरीही कमाल तापमान वाढत आहे. 

त्यामुळे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पावसाची सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच गडगडाटाची शक्यता आहे.

अरबी समुद्रामध्ये दक्षिण पश्चिम दिशेला कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या 3 दिवसामध्ये चक्रीवादळामध्ये रूपांतर झाल्यास ते सोमालियाच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे. 

या चक्रीवादळामुळे येत्या काही दिवसात कोकण किनारपट्टीसह औरंगाबाद, परभणी, बीड, जालना, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये वादळी वारा, गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नगर गारठले : राज्यात अद्याप थंडी जाणवत नसली तरीही राज्यात अहमदनगरमध्ये सर्वाधिक तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king