आम्ही आधीही हिंदुत्ववादी होतो आणि उद्याही राहणार आहोत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



सोमवारी नागपुरमधे शिवसैनिक मेलावा आयोजित केला गेला होता येथे 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. जर भाजप हिंदुत्वाचा बुरखा घालून देशावर घाव घालणार असेल, तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला दिला. पाकिस्तान आणि इतर मुस्लीम देशांमधील हिंदूंची काळजी दाखवतात, मग बेळगावमधील हिंदूंवर भाषिक अत्याचार होत असताना काय केलं? कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार आहे. त्यांनी काय पावलं उचलली? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ते नागपूर येथे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, "मुख्यमंत्रिपद मोठं आहे, त्यामुळे त्याची आव्हानं देखील मोठी आहेत. असं असलं तरी शिवसेना नेहमी मोठी आवाहनच घेते. हे आव्हान स्वीकारलं नसतं तर शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून ते माझ्यासाठी योग्य ठरलं नसतं."

नागपूर येथे जमलेल्या जनतेच्या उपस्थितीचं चित्र ताकत देणारं आहे. मी दिवसभराची कामं करुन कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्या समोर आलो आहे. मी तुमच्याकडे आधीही आलो आहे आणि यानंतर देखील येणार आहे, असंही ठाकरे यांनी नमूद केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी याच नागपुरात कर्जमुक्तीसाठी मेळावा घेतला होता. त्यावेळी देता की जाता असा सवाल केला होता. आपण विदर्भात खूप कामं आपण केली. आता सत्ता मिळाल्यावर आपल्या सरकाराने जुन्या सरकारसारखं वागलं तर मला चालणार नाही. सत्तेत जनतेसाठी आलो. म्हणूनच सत्तेत नम्रतापूर्वक राहून जनतेची कामं करायची आहेत.”


आम्ही आधीही हिंदुत्ववादी होतो आणि उद्याही राहणार आहोत. सरकारमध्ये येताच आम्ही धर्म परिवर्तन केलेलं नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king