शिर्डीच्या साईचरणी यंदा तब्बल 287 कोटींहून अधिक रकमेचे दान प्राप्त झाले आहे. यामध्ये ऑनलाइन, डेबीट व क्रेडीट कार्डच्या माध्यमातूनही देणगी आलेली आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2018 या वर्षापेक्षा 2019 या वर्षात साई चरणी अर्पण करण्यात आलेल्या देणगीमध्ये 2 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
साई संस्थानचे आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च असे असते. परंतु अनेकांना जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर वर्षात साई संस्थानला किती दान आले याची उत्सुकता असते.
2018 मध्ये साई चरणी 285 कोटी रुपयांचे दान आले होते. यंदा 2019 मध्ये साईबाबांच्या चरणी 287 कोटी 6 लाखांचे दान आले आहे. तसेच 19 किलो सोने व 391 किलो चांदीही प्राप्त झाली आहे.

● दक्षिणापेटी : 156 कोटी 49 लाख 2 हजार 350
● देणगी काऊंटर : 60 कोटी 84 लाख 8 हजार 590
● चेक-डीडीद्वारे : 23 कोटी 35 लाख 90 हजार 409
● मनिऑडर्स : 2 कोटी 17 लाख 83 हजार 515
● डेबिट/क्रेडिट द्वारे : 17 कोटी 59 लाख 11 हजार 424
● ऑनलाइन देणगी : 16 कोटी 2 लाख 51 हजार 606
● परकीय चलन : 10 कोटी 58 लाख 37 हजार 521
0 comments:
Post a Comment
Please add comment