SBI ने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे, हा नियम 1 जानेवारी 2020 पासून लागू होईल.
पैसे
काढण्यासाठी ओटीपी : एसबीआयने आपल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी वन टाइम
पासवर्ड म्हणजेच ओटीपी सुविधा आणली आहे. देशभरातील सर्व ATM मध्ये ही
सुविधा लागू होणार आहे.
SBI च्या ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ओटीपी टाकावा लागेल, अशी माहिती एसबीआयनेच ट्वीट करुन दिली.
अशी असणार व्यवस्था :
- ATM मध्ये गेले असता ग्राहकास एटीएम स्क्रीनवर रक्कमेसह ओटीपी स्क्रीनही दिसेल.
- ग्राहकांचा जो बँकेत नोंदणीकृत नंबर आहे, त्यावर ओटीपी पाठवला जाईल .
- ओटीपीच्या माध्यमातून ग्राहकाला पैसे काढता येतील.
या नवीन संकल्पनेमुळे फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी मदत होईल, असा बँकेला विश्वास आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment