“ॐ ऐँ ह्रीं क्लिं चामुँड़ायै विच्चै” : प्रियंका गांधींचे ट्विट

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सध्या सुरक्षेच्या कारणांवरून लखनऊ पोलिसांवर त्यांनी केलेला आरोप व उत्तर प्रदेशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांकडून अराजकता पसरवण्यात आल्याचाही केलेल्या आरोपामुळे अधिक चर्चेत आहेत. मात्र, आता त्यांच्या विषयीच्या चर्चांमध्ये आणखी एका चर्चेची भर पडल्याचे दिसत आहे. ही चर्चा आहे त्यांनी काल मध्यरात्री केलेल्या एका विशेष ट्विट बद्दलची.


प्रियंका गांधी यांनी काल मध्यरात्री १वाजेच्या सुमारास आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे “ॐ ऐँ ह्रीं क्लिं चामुँड़ायै विच्चै।।” हा दुर्गा सप्तशतीचा मंत्र ट्विट केला आहे. त्यांच्या या विशेष ट्विटमुळे त्यांचे फॉलोअर्स तसेच कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.
काँग्रेसचे नेते किंवा अन्य कोणासही नेमकं कोणत्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं प्रियंका गांधी यांनी ट्विट केलं आहे, याबाबत माहिती नसल्याचे दिसत आहे. मात्र, प्रियंका यांनी केलेल्या या ट्विटवर नागरिकांमधुन विविध प्रतिक्रिया येत आहेत.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king