महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सहाय्यक राज्यकर आयुक्त ,सहाय्यक आयुक्त, उद्योग संचालक, सहाय्यक संचालक, उपनिबंधक सहकारी संस्था, उप मुख्य कार्यकारी अधिकारी , गटविकास अधिकारी (बीडीओ), सहाय्यक गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, कक्ष अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, कौशल्या विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी इ. अशा २०० नागरी पदांच्या भरतीसाठी संयुक्त राज्य नागरी सेवा परीक्षा २०२० साठी अधिसूचना प्रकाशित केली आहे.
आयोग एमपीएससी संयुक्त राज्य नागरी सेवा परीक्षा २०२० साठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. पात्र उमेदवार एमपीएससी सिव्हील सर्व्हिस परीक्षा २०२० साठी १३ जानेवारी २०२० रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येईल अर्थात एमपीएससी राज्य सेवा २०२० प्रिलिम्स परीक्षा आणि एमपीएससी राज्य सेवा २०२० मुख्य परीक्षा. प्रिलिम्सची परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी आणि मुख्य परीक्षा ०२, ०३ आणि ०४ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात येईल. अधिक माहिती एमपीएससी राज्य सेवा भरती २०२० या लेखात खाली दिली आहे.
महाराष्ट्र
शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गतील एकूण २०० पदांच्या
भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा अयोगमार्फत राज्य सेवापूर्व परीक्षा
-२०२०, रविवार दिनांक ५ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.
0 comments:
Post a Comment
Please add comment