नुकत्याच
घेतलेल्या सर्वेक्षणात असे कळले आहे कि, मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग
घेतलेल्या धावपटूंमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असल्याचे
आढळून आले आहे.
इंटरनॅशनल
असोसिएशन ऑफ अॅथ्लेटिक्स फेडरेशन्स (आयएएएफ) ने आणि डेन्मार्कच्या रन
रिपीट नावाच्या संशोधन करणार्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाने केलेला हा
सर्वात मोठा संशोधनाचा अहवाल आहे.
संशोधनानुसार,
सध्या मॅरेथॉनमध्ये 50% च्या वर महिला धावपटू असतात. खरं तर, मागच्या 32
वर्षांत, महिला धावपटूंची संख्या 20% ने वाढली आहे. असे पहिल्यांदा झाले की
मागील वर्षी, मॅरेथॉनमध्ये पुरुष धावपटूंपेक्षा महिला धावपटू जास्त
होत्या.
धावपटूंचे सरासरी
वयही वाढले आहे. 1986 साली, मॅरेथॉन मध्ये भाग घेणार्या धावपटूंचे वय
सरासरी 38 वर्षे असायचे, म्हणजेच, त्या वयाचे होईसतोवरच ते धावायचे. आता हे
वय वाढून वर्षे झाले आहे.
आइसलँड राज्यात सर्वांत जास्त महिला धावपटू आहेत आणि त्या उलट स्वीत्झर्लंडमध्ये फक्त 16% महिला धावपटू आहेत.
हे
संशोधन तब्बल 32 वर्षे चालले आणि त्यात 70 हजार स्पर्धांमध्ये सर्वेक्षण
घेण्यात आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे 193 देशांच्या 10.79 कोटी
निकालांवर हे संशोधन करण्यात आले. अॅथलेटिक्सच्या इतिहासातील हा सर्वात
मोठा अभ्यास केलेला आहे.
मागील
2 वर्षांत मॅरेथॉनमध्ये भाग घेणार्या लोकांची संख्या 13% ने कमी झाली
आहे. 5 किलोमीटरच्या स्पर्धांमध्ये 13% चा उतार आणि हाफ मॅरेथॉनमध्ये तर
तब्बल 25% ने लोकांचा सहभाग कमी झाल्याचे आढळून आले आहे.
आणखी
एक मनोरंजक आकडेवारी अशी आहे की जगातल्या 63% देशांमधल्या पुरुष
धावपटूंपेक्षा स्वित्झर्लंडची महिला धावपटू जास्त वेगवान आहे. आयएएएफ आणि
रन रिपीट यांनी केलेल्या अभ्यासानुसार, स्पॅनिश पुरुष आणि स्विस महिला
सर्वात वेगवान आहेत. या क्रमवारीत, पोर्तुगाल दुसर्या स्थानी व नॉर्वे
तिसर्या स्थानावर आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment