जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांकडून दहशवाद्यांना शोधण्याची मोहीम राबवली जात असताना, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. चकमकीनंतर देखील परिसरात शोधमोहीम सुरूच आहे.
तब्बल पाच महिन्याच्या कालावधीनंतर जम्मू काश्मीरमधील सरकारी रूग्णालयांमध्ये ब्रॉडबँड सेवा तर सर्व मोबाईलवर एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून जम्मू काश्मीरमध्ये एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली. ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाइन, इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
0 comments:
Post a Comment
Please add comment