अनेकांना
झोपेत विविध समस्या हैराण करून सोडतात. काहींना वाईट स्वप्न पडतात, कधी
दचकायला होते. काहींना गरगरल्यासारखं होतं. या सगळ्यामुळे संपूर्ण दिवस
खराब सुध्दा जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया झोपेत आपल्यासोबत असं का
होतं?
झोपायच्या आणि
उठायच्या मधल्या वेळेतली स्थिती म्हणजे हायपनिक जर्क. या दरम्यान एखादी
व्यक्ती ही पूर्णतः झोपेलेली पण नसते किंवा जागी सुध्दा नसते.
लक्षात
घ्या 'हायपनिक' हा कोणताही आजार नाही. माहितीनुसार, जर तुम्ही झोपेत दचकून
जागे होत असाल तर ही सामान्य बाब आहे. सर्वसाधारणपणे 60 ते 70 टक्के
लोकांना हि समस्या जाणवते.
मात्र वारंवार तुमच्यासोबत असे होत असल्यास आजार सुध्दा असू शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.
दचकण्यामागे कारणं काय? :
● दिवसभरातील ताण-तणाव, चिंता तसेच थकवा यामुळे अशी समस्या उद्भवते.
● शरीरात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आर्यनची कमतरता असल्यास झोपेसंबंधी आजार उद्भवू शकतात.
● कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास समस्या निर्माण होऊ शकते.
'या' समस्येपासून बचाव करण्यासाठी* :
● दररोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या.
● झोपेच्या वेळेचे व्यवस्थित वेळापत्रक तयार करा.
● आहारात विशेषतः कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.
● झोपण्याच्या आधी सोडा, चहा, कॉफी यांसारखी पेय घेणे टाळा.
0 comments:
Post a Comment
Please add comment