मद्यप्राशन करण्यासाठी आतापर्यंत सुमारे अडीच लाख लोकांनी परवाने घेतले

पुणे :शहरात 'थर्टी फस्ट'च्या दिवशी अवैध मद्यविक्री आणि विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथके नेमली आहेत. १४ पथकांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. आज, मंगळवारी मद्यविक्रीची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत आणि परमिट रुम पहाटे पाच वाजेपर्यंत खुले राहणार असून, मद्यप्राशन करण्यासाठी आतापर्यंत सुमारे अडीच लाख लोकांनी परवाने घेतले आहेत. 

शहर आणि जिल्ह्यात होणारी अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयारी केली आहे. त्यासाठी काही ठिकाणे निश्चित केली आहेत. त्या ठिकाणांवर लक्ष ठेवून कारवाई केली जाणार आहेत. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे म्हणाले,'अवैध मद्यविक्री होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. विविध १४ पथकांद्वारे तपासणी केली जाणार आहे. अवैध मद्यविक्री होणारी ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. याशिवाय हॉटेल आणि अन्य ठिकाणी झडती घेऊन भेसळयुक्त मद्यविक्री होत आहे का, हे तपासले जाणार आहे.'

मद्यविक्रीची दुकाने ३१ डिसेंबरला रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. हॉटेल, परमिट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे,' असेही झगडे यांनी स्पष्ट केले. 'मद्यप्राशन करण्यासाठी एक दिवस, एक महिना, वर्ष आणि आजीवन असे परवाने देण्यात येतात. सुमारे अडीच लाख लोकांनी परवाने घेतले आहेत. शहरातील क्लबच्या सभासदांना मद्यप्राशनाचे आजीवन परवाने देण्यात येत आहेत. याबाबत क्लबचालकांची बैठक घेण्यात आली. त्यानुसार हे परवाने देण्यास सुरुवात झाली आहे,' असेही झगडे यांनी नमूद केले. 


मद्यविक्रीची दुकाने रात्री एकपर्यंत सुरू राहणार आहेत. संबंधितांनी सरकारमान्य दुकानांतूनच मद्य खरेदी करावे. अन्य ठिकाणी भेसळयुक्त मद्य असू शकते. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी. एक दिवसाचे मद्य प्राशन करण्याचे परवाने वगळता अन्य परवाने ऑनलाइन देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king