बियाण्यासोबत
बुरशीनाशकाची पुडी दिलेली असते. अजाणतेपणे फेकून दिलेल्या बुरशीनाशकाच्या
पुड्या शेतात चरणाऱ्या जनावरांच्या खाद्यात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे
विषबाधा होते.
विषबाधेची शक्यता
●
जनावरांना बुरशीनाशकाची विषबाधा दोन पद्धतीने झाल्याचे आढळून येते. जर
बुरशीनाशकाची पुडी पेरणी करताना शेतात फेकून दिली असेल तर मशागत करतेवेळी
बैल अजाणतेपणे अशी पुडी चघळतात किंवा पूर्णपणे खाऊन टाकतात. अशा घटना
सध्याच्या काळात घडलेल्या आहेत.
●
बुरशीनाशकाची पुडी बांधावर फेकून दिली असेल तर मशागतीनंतर बैल किंवा इतर
जनावरे त्या बांधावर चरण्यासाठी आणल्यावर गवताच्या बरोबरीने ही पुडी
जनावरांच्या आहारात जाते. त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते.
● जनावरांच्या आहारात बुरशीनाशक पावडर जास्त प्रमाणात (एक पुडी) गेली असेल तर त्यांना तीव्र विषबाधा होऊन दगावू शकतात.
●
बुरशीनाशकाची विषबाधा ही बैलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. काही
प्रमाणात सोयाबीन पेरणी केलेल्या शेताच्या बाजूस चरावयास सोडलेल्या
गायी-म्हशींमध्येही आढळून येते.
विषबाधा टाळण्यासाठी उपाययोजना
● बियाणे व बुरशीनाशकासोबत दिलेल्या मागर्दर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे.
● बियाणे प्रक्रिया करण्यासाठी प्लॅस्टिक हातमोजे, गम बूट व टोपी परिधान करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना विषबाधा होणार नाही.
● बुरशीनाशक पावडर हाताळताना ती तोंडावाटे किंवा श्वसनातून शरीरात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
●
बियाणे तसेच शेतीमध्ये लागणारी कीटकनाशके जनावरांच्या गोठ्यात ठेवणे
कटाक्षाने टाळावे, जेणेकरून जनावरांना अपघाती विषबाधा होणार नाही.
●
शेतीसाठी लागणारी कीटकनाशके, बुरशीनाशके ही शेती, जनावरांचा गोठा किंवा
परिसरात फेकून देऊ नयेत. याउलट ती सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवावीत.
●
शिल्लक राहिलेल्या कीडनाशकांच्या पुड्या किंवा पाकिटे यांची योग्य
विल्हेवाट लावावी. कोणत्याही परिस्थितीत कीडनाशकांच्या पिशव्या किंवा डबे
शेत तसेच गोठ्याच्या परिसरात फेकून देऊ नये.
0 comments:
Post a Comment
Please add comment