पंकजा मुंडे ह्या भाजपातच असणार असून माझा मात्र भरोसा नाही - ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे


गोपीनाथ गडावर दिवंगत भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे आदी उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणात खडसे यांनी  आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. पंकजा मुंडे ह्या भाजपातच असणार असून माझा मात्र भरोसा नसल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत सूचक वक्तव्य केले.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख असणाऱ्या भाजपला गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन समाजाचा पक्ष अशी ओळख मिळवून दिली. गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या संघर्षातून भाजपचे महाराष्ट्रात मजबूत स्थान निर्माण केले असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांना गोपीनाथ मुंडे यांनीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष केले होते. मी मंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी जागा मंजूर केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांचे मुख्यमंत्री झाले. तरी देखील स्मारक पूर्ण झाले नसल्याचे सांगत खडसे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

आज, गोपिनाथ मुंडे यांची आठवण आल्यानंतर भावूक होतो. आज पुन्हा संघर्षाचा काळ आयुष्यात आला आहे. मात्र, साथ देण्यासाठी गोपिनाथ मुंडेसोबत नाहीत याची खंत वाटत असल्याचे खडसे यांनी सांगितले.  यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपली मुलगी रोहिणी खडसे आणि माजी कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या पराभवामागील षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की, ज्यांनी भाजपच्या विकासासाठी काम केले त्यांना आता बाजूला सारले जात आहे आणि पक्षाचा अपमान केला जात आहे.माझ्यावर पक्षातल्या लोकांनी आरोप केले. माझी कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही खडसे यांनी म्हटले. संघर्षाच्या काळात पंकजा मुंडे यांनी स्वत: ला एकटे समजू नये. आम्ही सर्व त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही खडसे यांनी दिली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पडदा हल्ला करीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी म्हटले की सध्याचे राजकीय पक्ष नेतृत्त्व "वैराग व मत्सर" असल्याचे दर्शविते. सत्तेच्या दुसरा  कार्यकाळात फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या केवळ ८०  तासांच्या कार्यकाळावर टीका करताना खडसे म्हणाले की, “वेळोवेळी काही वेळा चमत्कार केले जातात". त्याचवेळी खडसे यांनी ठामपणे सांगितले की ते भाजपवर "नाखूश" नाहीत त्यांनी  पत्रकारांशी बोलतना सांगितले।

राज्य निवडणूक होण्यापूर्वी भाजपाने अनेक मंत्री व विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले. खडसे म्हणाले की, गेल्या काही दशकांमध्ये भाजपाच्या विकासासाठी काम करणाऱ्याना  आता पक्षात बाजूला सारले गेले आहे. ओबीसी नेत्याने असा आरोप केला की, अशा लोकांचा पक्षाकडून अपमान केला जात आहे. "एकेकाळी उच्च जाती आणि व्यापाऱ्याचा  पक्ष म्हणून भाजपाची खिल्ली उडविली जात असे, परंतु गोपीनाथ मुंडे यांनीच कष्ट करून इतर मागासवर्गीय समाजातील लोकांना पक्षात आकर्षित केले. त्यांनी अनेक ओबीसी नेत्यांना वाढण्यास आणि जागा मिळविण्यात मदत केली, "खडसे म्हणाले.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king