जळगाव जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मक्याचे दर मागील आठ महिन्यांपासून स्थिर आहेत. यंदा या पिकाचे अतिवृष्टीत नुकसान झाले. साहजिकच जळगाव बाजारात आवक कमी आहे. कमी दर्जाच्या मक्याला क्विंटलला १००० रुपये तर दर्जेदार किंवा कमी आर्द्रतेच्या मक्याला २२०० रुपये कमाल दर मिळाला आहे. पोल्ट्री, स्टार्च उद्योगात मक्याची मोठी गरज असल्याने कायम मागणी राहते. त्यामुळे दर पुढेही टिकून राहू शकतील असा अंदाजही बाजारपेठेतील विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
*मिळालेले दर*
चांगल्या
ग्रेडच्या मक्याला ऑक्टोबरमध्ये प्रति क्विंटल २२०० रुपये तर कमी
दर्जाच्या मक्याला प्रति क्विंटल किमान ८०० रुपये व कमाल १२०० रुपये दर
मिळत आहे. मक्यात आर्द्रता अधिक असल्याने कमाल दर त्यापुढे न गेल्याचे
चित्र आहे. मागील वर्षीदेखील दर ९०० ते १७०० रुपये होते. परंतु
जानेवारीपासून ते स्थिरावले.
त्यानंतर
ते २२०० रुपयांपर्यंत पोचले. मागील रब्बी हंगामात एकरी सरासरी १८ क्विंटल
उत्पादन साध्य झाले. यंदाच्या खरिपात हेच उत्पादन १० ते १५ क्विंटलपर्यंत
साध्य होऊ शकले. मागील हंगामात तसेच उन्हाळ्यात कडब्याचा तुटवडा होता.
यामुळे कडब्याची थेट शेतातून एकरी सात ते नऊ हजार रुपये या दरात खरेदी
झाली. प्रतिशेकडा तीन हजार रुपये दर कडब्याला होता. सद्यःस्थितीत त्याचा
दर्जा घसरला असला तरी दर प्रतिशेकडा साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहेत.
मक्याला ठिबक फायदेशीर
मक्याची
बारमाही लागवड चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर या भागांत केली
जाते. जळगाव भागात अनेक शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. त्यामुळे एकरी
उत्पादकता मागील दोन वर्षे टिकून राहिली आहे. काही शेतकऱ्यांनी अनुकूल
स्थितीत एकरी ३० ते ३५ क्विंटल उत्पादन रब्बी हंगामात घेतले आहे. खरिपाच्या
तुलनेत अधिक उत्पादन रब्बीमध्येच साध्य करता येते असा त्यांचा अनुभव आहे.
खरिपात मका घेतल्यानंतर शेतकरी मग केळीसारखे पीक घेतात. खरिपात काळी कसदार,
सुपीक जमीन निवडतात. कारण पाऊसमान लहरी झाले तर अशा जमिनीत फारशा अडचणी
येत नाहीत.
0 comments:
Post a Comment
Please add comment