आयुर्वेदीय कविता

आयुर्वेदीय कविता🌱🌷

  • खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा।
मधातून चाटा हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा।
  • लागला मुका मार, सुजून पाय झाला असेल गारद।
लेपासाठी उगाळा तुरटी, रक्त चंदन, आंबेहळद।
  • कोंड्याचा झाला आहे कां डोक्यामधे साठा?
केस धुतांना लावा मेंदी, शिकेकाई, रिठा।
  • सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन।
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन।
  • उन्हामधे रापून चेहरा झाला कां सावळा गडद?
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद।
  • बारीक आहे कुडी म्हणून होऊं नको तू बावरी।
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी।
  • पिकला एक केस होईल डोक्यावर चांदी।
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा मेंदी।
केसांना लावा कचूर सुगंधी, मेंदी, जास्वंद।
केस होतील लांब सडक, सुगंध दरवळेल मंद ।
  • गाणं म्हणण्यासाठी झालां आहांत तुम्ही अधीर।
गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठमध, शंगीर।
  • अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा?
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या अश्वगंधा।
  • पित्तप्रकोप झाला आहे, पोटातून येत आहेत कां कळा?
पोटात घ्या आवळा, हिरडा, बेहडा म्हणजेच त्रिफळा।
  • वातामुळे पोटामध्ये होत आहेत कां वेदना?
खा ओवा, सैंधव मीठ, आलं, लिंबू पुदिना।
  • संगणकावर काम करून थकली आहे कां नजर?
डोळ्यांसाठी खावे चांगले पपई आणि गाजर।
  • लहान वयामध्येच ढोल मटोल झाला कां तुमचा बेटा?
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा।
  • धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस।
शुद्ध हवेसाठी झाडे लावा कडूनिंब आणि तुळस।
  • छोटे छोटे आजार, बरं कां, घरच्या घरीच हटवा।
प्रत्येकाच्या घरी असूद्या आरोग्याच्या महामंत्राचा बटवा।




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment