हिंदूंना विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवू : गोपालकृष्णन

नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देणाऱ्या आखाती देशांमध्ये राहणाऱ्या हिंदूंना काही लोक धमकावत असून, अशा धमकावणाऱ्या लोकांना पाकिस्तानात पाठवले जाईल, असे वाद निर्माण करणारं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बी. गोपालकृष्णन यांनी केलं आहे. इंडियन यूनियन मुस्लीन लीगने जातीयवादी तत्वांना हटवले आहे. आखाती देशात राहणाऱ्या हिंदूना धमकावणाऱ्यांना पाकिस्तानात जाण्यास आम्ही भाग पाडू अशा शब्दात गोपालकृष्णन यांनी म्हटले आहे.
नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याने बहरीमधील एका केरळमधील हिंदू मालकाचे हॉटेल केरळमधील लोकांनी लक्ष्य केले, असे गोपाळकृष्णन म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत केरळमधील लोकांच्या एका जमावाने बहरीनच्या एका हॉटेलात निदर्शने केल्याचे दिसत आहे. या हॉटेलचे मालक त्रिशूरचे रहिवासी आहेत. या मालकाने नागरिकता कायद्याचे समर्थन केले होते.'
तर राशनही बंद करणार!

केरळ सरकारने एनपीआरच्या प्रक्रिया रोखली तर केरळ राज्यातील राशन बंद केले जाईल, अशी धमकीही गोपाळकृष्णन यांनी दिली. राज्यातील राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) यादी अद्ययावत करण्याबाबतची प्रक्रिया केरळमधील एलडीएफ सरकारे रोखल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पी. विजयन यांना एनपीआर प्रक्रिया लागू करावीच लागेल. जर असे झाले नाही, तर आम्ही सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत देण्यात येणारे राशन बंद करू, अशा शब्दात त्यांनी केरळ सरकारला इशारा दिला आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king