मुंबई : आशियातील शेअर बाजारांमध्ये तेजीचे आज भारतीय बाजारांवर पडसाद उमटले. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ३५० अंकांची झेप घेतली असून सध्या तो ४१ हजार ५१० अंकांपर्यंत पोहचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०० अंकांच्या वाढीसह १२ हजार २२५ अंकांवर व्यवहार करत आहे.
इक्विटी फंडसर्वार्थाने फायदेशीर
आज ऑटो, आयटी एनर्जी , इन्फ्रा, बँक या क्षेत्रात सध्या खरेदीचा ट्रेंड आहे. चीनमधील औद्योगिक उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे आशियातील बहुतांश बाजारांमध्ये तेजी आहे. गुरुवारी भारतीय बाजारांमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५०४ कोटींचे शेअर्स खरेदी केले.
हे शेअर तेजीत
आयसीआयसीआय सिक्युरिटीज, अलाहाबाद बँक, बँक आॅफ बडोदा, आयआरबी इन्फ्रा, एसबीआय, पीएनबी, एलआयसी हाैसिंग फायनान्स हे शेअर तेजीत आहेत.
या शेअरमध्ये झाली घसरण
रिलायन्स कॅपिटल, येस बँक, टाटा मेटालिक, एयू स्माॅल फायनान्स बँक या शेअरवर विक्रीचा दबाव दिसून आला.

0 comments:
Post a Comment
Please add comment