बॉक्सिंगपटू सुमितवर 1 वर्षाची बंदी

भारताचा स्टार बॉक्सिंगपटू सुमित सांगवानवर उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्यामुळं एका वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 

                   

 प्रकरण काय? : 10 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेश येथे झालेल्या चाचणीत सुमितच्या सॅम्पलमध्ये अ‍ॅसेटॅझोलामाइड या उत्तेजकांचे अंश सापडले. ऑलिम्पिक आणि नॅशनल चॅम्पियन (91 किलोग्राम) सांगवानवर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून ही बंदी लादण्यात आली आहे.

 ऑलिम्पिकचे स्वप्न भांगणार :

▪ सांगवानच्या बंदीचा कालावधी 26 डिसेंबर 2019 पासून सुरू झाला आहे. त्यामुळं सांगवान पुरुषांच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत भाग घेऊ शकणार नाही.

▪ पुरुषांची ऑलिम्पिक पात्रता फेरी 29-30 डिसेंबर रोजी बरेलीमध्ये होणार आहे. या फेरीत निवडले बॉक्सर 3 ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक क्वॉलिफायर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.

 दरम्यान, या 1 वर्ष बंदीच्या काळामुळे सुमितला पुढील वर्षी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळात येणार नाही.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment