2019 वर्ष संपण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी राहिले आहेत. या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला पॅन कार्ड आणि एटीएम कार्डबाबत काही प्रक्रिया पूर्ण करून घ्याव्या लागतील. तुमच्याकडे मॅग्नेटिक स्ट्रिप असलेली जुनी एटीएम कार्ड असतील तर 31 डिसेंबरपर्यंत ते बदलून घ्यावं लागेल. जर असं केलं नाहीत तर तुमचं एटीएम कार्ड बंद पडू शकतं.
एटीएम कार्ड बँकेकडून मोफत बदलून दिलं जातं. ते ऑनलाइन किंवा ज्या शाखेत खातं आहे तिथून करता येतं. तसेच नेट बँकिंगद्वारेही नवीन एटीएम कार्डसाठी अर्ज करता येतो. काही बँकांनी याबाबत आधीच मेसेज पाठवले होते. एसबीआयने 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
एटीएमशिवाय आधार पॅन लिंकिंगसाठी 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. तुम्ही जर आधार लिंक केलं नाहीत तर पॅनकार्ड अवैध ठरवलं जाईल. यासाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.
आधार पॅन लिंकिंग कसं करायचं?
आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा. तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या. तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर लिंक आधार पर्यायावर क्लिक करा. तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल.
याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते. UIDPAN<आधार क्रमांक><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.
0 comments:
Post a Comment
Please add comment