'आम्ही वाईट आहोत तेच बरं आहे. चांगले होतो तेव्हा कुठलं मोठं पदक मिळालं होतं' : संजय राऊत

नवी दिल्ली: 'शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबद्दल काहीही ठरलेलं नाही. आमच्याकडं आघाडीतल्या पक्षांनी तशी काहीही मागणी केलेली नाही. जे काही होईल, ते लवकरच कळेल. विनाकारण आधीच गोंधळ उडवू नका,' असं आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज मीडियाला केलं. 
राज्यातील सत्तास्थापनेच्या मॅरेथॉन चर्चा सध्या राजधानी दिल्लीत सुरू आहेत. या बैठका प्रामुख्यानं काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरू असल्या तरी शिवसेना या साऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. आघाडीचे नेतेही शिवसेनेच्या संपर्कात आहेत. संसद अधिवेशनाच्या निमित्तानं दिल्लीत असलेले संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा या घडामोडींबदद्ल माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे का असं विचारलं असता, त्याबाबत अजून काहीही ठरलेलं नाही. न झालेल्या चर्चेच्या बातम्या करू नका. त्या अफवांच्या आधारांवर गोंधळ उडवून देऊ नका. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही,' असं ते म्हणाले. 'आता दिल्लीतील काम संपलं आहे. सरकारबद्दलच्या पुढील चर्चा मुंबईत होतील. तिन्ही पक्षांची संयुक्त बैठकही मुंबईतच होईल, असं राऊत यांनी यावेळी सांगितलं. 


ट्विटरवरून भाजपला टोला 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रात येण्याची शक्यता निर्माण झाल्यानं भाजपमध्ये अस्वस्थता आहे. जनतेनं दिलेल्या कौलाचा हा अपमान आहे, अशी टीका भाजपनं सुरू केली आहे. त्याला संजय राऊत यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. 'आम्ही वाईट आहोत तेच बरं आहे. चांगले होतो तेव्हा कुठलं मोठं पदक मिळालं होतं,' असं राऊत यांनी म्हटलं आहे. 




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king