डॉ. प्रकाश आमटे लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने बिल गेट्स यांच्या हस्ते गौरवान्वित


थोर समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांना आज बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.


आज संध्याकाळी नवी दिल्ली येथील आयसीएमआर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन कॉसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवेत्‍ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना  आज बिल गेट्स यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यात डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांचा  समावेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे डॉ.प्रकाश आमटे यांनी १९७३ मध्ये लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. तेव्हापासून भौतिक सुविधांचा प्रचंड अभाव असतानाही डॉ.प्रकाश आमटे व डॉ.सौ.मंदाकिनी आमटे यांनी अशिक्षित व गरीब आदिवासींना आरोग्य सुविधा पुरवून त्यांना शिक्षणाची संधीही उपलब्ध करुन दिली. लोक बिरादरी प्रकल्पामार्फत आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले असून त्यासाठी स्वत:चे संपूर्ण आयुष्य  समर्पित केले आहे.

यापूर्वी डॉ. प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानै ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी. लिट) पदवीने गौरवान्वित केले होते. २००९ मध्ये डॉ.प्रकाश आमटे यांना रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  डॉ.प्रकाश आमटे यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते गौरव होणं, ही बाब पुन्हा जिल्हावासीयांसाठी भूषणावह ठरली आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king