महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आमदारांना मतदारांचे खुले पत्र



महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आमदारांना मतदारांचे खुले पत्र ✒✒✒

 युती - आघाडीतल्या सर्वच आमदारांचे  २४ ऑक्टोबर पासून आजपर्यंतचे वर्तन हे  मतदार /जनता मूर्ख आहे हे गृहीत धरणारे व लोकशाही ला काळीमा फासणारे  आहे आणि याचा आम्ही तीव्र निषेध करतो .

 लोकशाही व्यवस्थेत जनता जनार्धनाच्या मताला  सर्वोच्च स्थान असते असे म्हटले जाते परंतू प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींसाठी सत्ताप्राप्ती लाच सर्वोच्च स्थान असते हे आता सर्वच जनतेला कळून चुकले आहे .

सत्तेच्या संघर्षात युतीने , आघडीने वा खिचडी ने  विश्वास मत पास केले तरी एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे की आम्हा मतदारांच्या विश्वास परीक्षेत तुम्ही  सर्वच पक्ष व सर्वच आमदार नापास झालेले आहात.

 आजवर किमान काही अंशी आमचा विश्वास होता की  , प्रत्येक पक्षाला काही विचारधारा असते परंतू गेल्या महिन्यातील आपणा सर्वांचे वर्तन हे उघड्या डोळ्याने पाहता व आपणा सर्वपक्षीयांचे वर्तन हे कमरेचे सोडून , डोक्याला गुंडाळणारे  आहे.
       हे वर्तन पाहता आम्हाला खात्री पटली आहे की , नाही ! आपणा सर्वांचें झेंडे ,चिन्ह ,पक्ष  वेगवेगळे असले तरी आपणा सर्वांचे ध्येय मात्र केवळ एक व एकच दिसते ते म्हणजे एनकेन प्रकारे सत्ताप्राप्ती .
        अर्थातच असे ध्येय असण्यात गैर नक्कीच नाही मात्र आपण सर्वांनी जनमताचा अनादर करत सत्ता ..सत्ता आणि सत्ता या ध्येयप्राप्ती साठी जो मार्ग चोखाळला  आहे तो मात्र अतिशय निषेधार्य आहे.
    आपण सर्वपक्षीय नेते -आमदार नेहमीच महाराष्ट्राचा उल्लेख हा पुरोगामी महाराष्ट्र असा करत असतात पण याच महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात जो काही राजकीय तमाशा चालू आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला तडा गेला आहे , संपूर्ण भारतात व जगात महाराष्ट्राची नाच्चकी झालेली आहे .

होय ! आज ना उद्या कुठले ना कुठले  सरकार येईलच ... कुठलेही सरकार आल्याने  फारसा फरक पडत नाही हे गेल्या ७० वर्षाच्या अनुभवातून आमच्या ध्यानात आलेले आहे

परंतू  आपण सर्वपक्षीय आमदारांच्या वर्तनामुळे महाराष्ट्राची तुलना बिहारशी केली जाऊ लागली आहे आणि भविष्यात याची किंमत संपूर्ण महाराष्ट्राला आगामी बऱ्याच काळासाठी भोगावी लागणार आहे .

     ... आणि त्या पुढे जाऊन एक गोष्ट लक्षात घ्या की , आम्हा ९५ टक्के सामान्य नागरीकांना कोणतेही सरकार असले तरी तिळमात्र फरक पडत नाही  फरकच पडत असेल तर तो तुम्हाला...आम्हाला नाही...
 त्यामुळे लोकांची भावना आहे की , अमुक -तमूक सरकार असले पाहिजे   जनभावनेच्या नावाखाली आपण धूळफेक करत केवळ आपल्या पोळीवर तूप ओढण्याचा प्रयन्त करत असतात हे आम्ही जाणतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी , कामगारांच्या हितासाठी हि दवंडी पिटवणे बंद करा.  

              होय ! एक चांगले झाले , गेला महिनाभर चाललेल्या  सत्तेची मलाई लाटण्याच्या संघर्षातून आपल्या सर्वांचा बुरखा फाटून खरे स्वरूप आम्हा समोर आले आहे  . आपणां सर्वांचा  बुरखा  वेगवेगळा असला तरी त्या मागे लपलेला खरा चेहरा हा सारखाच आहे आणि तो म्हणजे सत्तापिपासू चेहरा  . निर्लजपणाचा कळस काय असू शकतो हे आपण सर्वांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेले आहे .

       आपण २८८ लोकप्रतिनिधी पैकी एकालाही आपल्या मतदारांशी देणेघेणे नाही हेच आपण दाखवून दिलेले आहे . संपूर्ण महाराष्ट्र ओला  दुष्काळ , त्यातून झालेली पिकांची हानी व त्यातून उडणारा महागाईचा  आगडोंबात होरपळत असताना आपण मात्र सत्तेच्या तमाशात मश्गुल असल्यामुळे आप-आपल्या मतदारसंघात फिरक ला देखील नाहीत .

      आता , आपण भविष्यात जेंव्हा आम्हा मतदारांसमोर येताल तेंव्हा तुमचा हिशोब करूच . परंतू आम्हा मतदारांचे आपणास केवळ एकच सांगणे आहे की  , या पुढे तरी आपण छत्रपती शिवाजी -शाहू -फुले -आंबेडकर-गांधी -टिळक-आगरकर या महामानवांचे नाव घेत जाऊ नका कारण तुमच्या पैकी एकाच्याही आचरणात १ टक्का  देखील त्यांचे विचार नाहीत . तुमचा विचार एकच दिसतो तो म्हणजे सत्तेसाठी काहीही .  
♦      आम्हा मतदारांच्या समोरील  सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की , जेंव्हा तुम्ही भविष्यात आमच्या समोर येताल तेंव्हा आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा  ?  का विश्वास ठेवायचा?

शेवटी, जाता जाता हेच सांगणे आहे की, आता या पुढे तरी , आमच्या पुढ्यात येऊन आम्हाला लोककल्याणकारी राज्यासाठी , लोकांच्या सेवेसाठी मताची भिक मागू नका ... आम्हा मतदारांच्या नावाने अश्रू गाळणे बंद करा...
_आम्ही सर्व महाराष्ट्रीयन  मतदार मूर्ख आहोत असे गृहीत धरून चालवलेला लोकशाही ला काळीमा फासणारा तमाशा बंद करा.
भविष्यात आमची फसवणूक थांबवण्यासाठी तुमच्या युत्या_ आघाड्या बंद करा. तुमचे खायचे आणि दाखवायचे दात वेग_ वेगळे आहेत. तुम्ही सर्व एकच आहात आणि ते म्हणजे.... लोकशाही व्यवस्थेला लागलेली कीड...

  आजवर तुम्ही मतदार विसराळू आहेत हे गृहीत धरत वाटचाल करत आहात हे आम्हाला ज्ञात आहे पण गेल्या महिन्याभरातील तुम्हा सर्व पक्षीय आमदारांचे वर्तन हे विसरण्या पलीकडचे आहे ... आम्ही या गोष्टी   कदापिही विसरणार नाही  हे तुम्हीच लक्षात ठेवा.

  




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king