“पक्ष आणि कुटुंबात फूट” सुप्रिया सुळेंच व्हाट्सअँप स्टेटस.

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. या घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.


अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे,’ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी फुटली, हे आता स्पष्ट झालं आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळेदेखील प्रसार माध्यमांसमोर भावुक झाल्याचे दिसल्या . मात्र त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया यावेळी दिली नाही .
दरम्यान आज सकाळी भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे . या सगळ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार कुटुंब दिसलं आहे. राष्ट्रवादीचे इतर कोणतेही नेते किंवा स्वत: शरद पवार हे यावेळी कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जेव्हा या सगळ्या घटनाक्रमाबद्दल प्रतिक्रिया देतील, तेव्हाच याबाबतची स्पष्ट होऊ शकणार असून याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे .




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king