मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आज पार पडल्या. अपेक्षेप्रमाणे मुंबई महापालिकेच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली. तर, पुण्याच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ निवडून आले.
महापौर निवडणुकीबाबतच्या घडामोडी....
महापौर निवडणुकीबाबतच्या घडामोडी....
- पुणे: भाजपचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं चर्चेला उधाण
- पुणे: भाजपच्या मोहोळ यांच्याकडून महाविकासआघाडीचे प्रकाश कदम (राष्ट्रवादी काॅंग्रेस) यांचा ३८ मतांनी पराभव
- पुणे: पुणे महापालिकेवर भाजपचा झेंडा, महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची निवडपिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपचे तुषार हिंगे
- पिंपरी: राष्ट्रवादीच्या उमेदवार माई काटे यांना ४१ मते, तर माई ढोरे यांना ८१ मते. शिवसेनेच्या नगरसेवकांनी केले राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या माई ढोरे... राष्ट्रवादीच्या माई काटे यांचा ४० मतांनी पराभव
- पिंपरी चिंचवड महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीला शिवसेनेची साथ.
- मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मुंबई महापालिकेत पोहोचणार
- नागपूर: संदीप जोशी यांना मिळाली १०४ मते, काँग्रेसच्या हर्षला साबळे यांना २६ मते . नागपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे संदीप जोशी यांचा ७८ मतांनी विजय .
- लातूर: महापौरपदी काँगेसचे विक्रांत गोजमगुंडे... माजी मंत्री संभाजी निलंगेकर यांना मोठा धक्का
- लातूरमध्ये भाजपला झटका; नगरसेवक फुटले.
- अमरावती महानगरपालिका महापौरपदी भाजपचे चेतन गावंडे तर उपमहापौरपदी भाजपच्या कुसुम साहू यांची निवड .
- नाशिकच्या उपमहापौर पदी भाजपच्या भिकुबाई बागुल यांची बिनविरोध निवड... काँग्रेस, राष्ट्रवादीने माघार घेतल्यामुळं मार्ग मोकळा .
- नाशिक: महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी
0 comments:
Post a Comment
Please add comment