वाचा एक सुंदर सत्य कथा...

ज्या हॉटेल मध्ये वडील चौकीदार होते, तिथेच घेऊन गेला मुलगा ....



प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते परंतु यशाची खरी मजा तेव्हा आहे जेव्हा आपल्या सोबत हा आनंद घेण्यासाठी आपले कुटुंब देखील सोबत असते. प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा अनुभव घेताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा असतो.

आर्यन ला देखील असाच अनुभव आला. आजच्या कथेतील आपला नायक आर्यन आहे. आपल्या कुटुंबास हा आनंद घेताना त्याने आपल्या डोळ्यांनी बघितले आहे. आर्यनचे वडील रोज सकाळी वृत्तपत्र विकत होते आणि आई घरकाम करत होती. त्याला लहानपणापासून ग्रह तारे बघायची उस्तुकता होती.
घर लहान होते, समस्या अनेक होत्या परंतु या परिस्थितीमध्ये आर्यन याची काही तरी करून दाखवायची इच्छा शक्ती कमी झाली नाही. आपल्या भागात एका खाजगी शाळेत तो शिकायला जात होता. वयाच्या १० व्या वर्षी त्याला खगोलशास्त्र या विषयात आवड निर्माण झाली.
जेव्हा वयाच्या १० व्या वर्षी आर्यननि शनी ग्रहाच्या बाजूचे कडे टेलीस्कोप मधून बघितले तेव्हा त्याने ठरविले आपला प्रवास हा लांबचा असणार आहे. अनेक वर्ष पैसा जमा करून आणि रिकाम्या वेळेत काम करून आर्यननि ५००० रुपये जमा केले आणि त्या पैश्यापासून एक टेलीस्कोप विकत घेतला. घरवाल्याना वाटत होते आर्यनचे पैसे वाया गेले.
परंतु आर्यनच्या घरच्यांना माहिती नव्हते हि छोटीशी गोष्ट त्यांचे आयुष्य बदलणार आहे. वयाच्या १४ वर्षी आर्यननि एका एस्टेरॉइडचा शोध लावला. आर्यनला अनेक मिडिया कवर करू लागली अनेक ठिकाणी त्याला बोलायला निमंत्रण मिळत होते. तेव्हा त्याच्या ध्यानात आले कि तो Astronomy Lecturer म्हणून आपले करीयर करू शकतो.
पहिल्याच महिन्यात आर्यननि ३०,००० रुपये कमविले सोबत तो Ted Talk देखील देऊ लागला. आज आर्यन १९ वर्षाचा आहे तो आर्थिक स्वतंत्र आहे. त्याला स्वतःची प्रयोगशाळा उघडून संशोधन करायचे आहे.
नुकताच वाराणसी वरून येताना त्याच्या परिवाराने पहिल्यांदा विमानाने प्रवास केला. आणि वडील ज्या हॉटेल मध्ये चौकीदार होते तिथेच त्यांनी मुक्काम केला. आर्यन अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून मोठी ख़ुशी परिवारासोबत मिळवत आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king