संयुक्त राष्ट्रांचा लोकसंख्या अहवाल २०१९

सयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक विभागाच्या लोकसंख्या शाखेकडून जागतिक लोक संख्येचा द्विवार्षिक अहवाल १७ जून २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.

● ‘वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स' या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार जागतीक लोकसंख्या ७.७१ अरब एवढी आहे.

● २०२० मध्ये ७.७९ अब्ज, २०३० मध्ये ८.५५, अब्ज २०५० मध्ये ९.७४ अब्ज एवढी होणार आहे.

● या अहवालानुसार १४३.४ कोटी लोकसंख्या असलेला चीन सध्या (२०१९) सर्वाधिक लोकसंख्या असलेलें देश आहे तर दुसऱ्या स्थानावर भारत (१३६.६ कोटी लोकसंख्या) व तिसऱ्या स्थानावर अमेरिका (३२.९ कोटी) आहे.

● संयुक्त राष्ट्रांच्या ‘वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स २०१९’च्या अहवालानुसार येत्या ८ वर्षांत २०२७ साली भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देश म्हणून गणला जाणार आहे.

● या अहवालात २०५० पर्यंत भारताच्या लोकसंख्येत २७ कोटी ३० लाखांची भर पडेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

● या अगोदर सयुंक्त राष्ट्र संघाने २०१७ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०२४ मध्ये भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलें देश ठरणार आहे असे म्हटले होते.

●२०५० या वर्षी भारताची एकूण लोकसंख्या १६३.९ कोटी तर चीनची लोकसंख्या १४०.२ कोटी होण्याचा अंदाज सयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक विभागाच्या लोकसंख्या शाखेकडून प्रसिद्ध केलेल्या २०१९ च्या अहवालात व्यक्त केला आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment