साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत स्थान

नवी दिल्लीः मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत स्थान देण्यात आले आहे. साध्वींची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या कमिटीचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे करीत आहेत. सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव करीत भोपाळमधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. 
संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. यात प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. कमिटीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, आदी नेत्यांचा समावेश आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून त्या चर्चेत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला देशभक्त संबोधने, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर जादू टोना केल्याचे वक्तव्य करणे, यासारखे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रत्येकवेळी भाजपकडून स्पष्टीकरण दिले जाते. तसेच वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना इशारा दिला जातो. त्यानंतरही त्यांचे वादग्रस्त वक्तव्य करणे सुरूच आहे. साध्वी यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गोडसेला देशभक्त म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत चांगलाच गदारोळ केला होता. या वादाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. या वादावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, साध्वी प्रज्ञांना मी मनातून कधीच माफ करणार नाही. त्यानंतर भाजपने साध्वींना या वक्तव्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या २००८ मधील मालेगाव स्फोट प्रकरणात आरोपी आहे. तसेच त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. भोपाळमध्ये भाजपच्या तिकीटावर उभ्या असलेल्या साध्वींनी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा दारुण पराभव केला आहे. 




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment