रासायनिक तणनाशकांचा वापर


रासायनिक तणनाशकांचा वापर

             



 जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व रोगांचा बंदोबसत करणे एवढेच समजले जाते, मात्र आणखी एक महत्वाचा जैविक घटक म्हणजे तणांचा प्रादुर्भाव. तर  चला आपण विविध रासायनिक तण नाशके व त्यांच्या फायद्याविषयी माहिती जाणून घेऊया...

▪ *2, 4- डी* : हे घोळ, चांदणी, काटेमाठ, वसंतवेल, दीपमाळ, तांदुळजा यांसारख्या रुंद पानांच्या द्विदल तणांना नष्ट करण्यासाठी लाभदायक आहे. हे तणनाशक ज्वारी, बाजरी, मका, गहू, ऊस यांसारख्या द्विदल व रुंद पानांच्या पिकांना घटक आहे.

▪*अ‍ॅट्राझीन* : हे निवडक तणनाशक असून ज्वारी, बाजरी, मका, ऊस, द्राक्षे व इतर पिकांमधले वार्षिक रुंद पानाच्या गवत वर्गातील तणांचा नाश करते. हे तण उगवणीपूर्वी किंवा उगवणीनंतर फवारता येते.

▪ *बासालीन* : हे निवडक तणनाशक असून कापूस, भुईमूग, सोयाबीन, वाटाणा, टोमॅटो, बटाटे, हरभरा, तूर, वांगी आदी पिकातील तणांचा नाश करते. याचा वापर मुख्य पीक पेरण्याआधी करावा.

▪ *स्टॅम एफ-34 (प्रोपानिल)* : गवतवर्गीय तणे व रुंद पानांच्या ताणासाठी याचा वापर केला जातो. हे स्पर्शजन्य तणनाशक आहे. या तणनाशकामुळे दोन ते चार पानांच्या अवस्थेतील तणांचा लवकर नायनाट होतो.

▪ *पॅरक्वॉट* :  हे स्पर्शजन्य साधारण तणनाशक आहे. याचा मुख्यत्वे गवतवर्गीय तणे नष्ट करण्यासाठी वापर होतो. तसेच द्राक्षे, मोसंबीवर्गीय पिके, चहा, कॉफी, रबर, गवतवर्गीय तणे व पाण्यात वाढणारी तणे नष्ट करण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो.

▪ *डायक्वॉट* : या तणनाशकाने सर्व प्रकारची तणे नष्ट होतात. मात्र द्विदलवर्गीय तणांसाठी हे विशेष प्रभावी असून पाण्यात वाढणाऱ्या ताणांसाठीही फायदेशीर आहे.

▪ *मॅचेट (ब्युटाक्लोर)* : पेरलेल्या पिकातील गवतवर्गीय तणे व रुंद पानांच्या तणांचा बंदोबस्त मॅचेट वापरून चांगल्या प्रकारे करता येतो. दाणेदार स्वरूपातील तणनाशक तण उगविण्यापूर्वी तर द्रव स्वरूपात मिळणारे तणनाशक तणे उगवल्यानंतर फवारतात.

▪ *ग्लायफोसेट 41 एस. एल. (ग्लायसिल/ राऊंड अप/ ग्लायफॉस)* : हे तणनाशक लव्हाळा, हरळी किंवा रुंद पानांच्या ताणांचाही उत्तम प्रकारे नायनाट करते. विशेष म्हणजे हे पेरणीपूर्वी लव्हाळ्याचा नाश करण्यासाठी वापरले जाते.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king