यूपीत सापडली ३००० टन सोन्याची खाण!


उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 3 हजार ३५० टन सोन्याचा खजिना सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. लवकरच या सोन्याचा लिलाव होणार असून यासाठी सरकारतर्फे सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात हा खजिना सापडला आहे. अनेकदा सोनभद्र हा जिल्हा नक्षलवादी घडामोडींनी चर्चेत होता. गरीब असलेला हा सोनभद्र जिल्हा लवकरच सोन्याची खाण सापडल्याने श्रीमंत होणार आहे. 
उत्तर प्रदेशातील सोनभद्र या जिल्ह्यातील सोन पहाडी नजीक जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (जीएसआय), उत्तर प्रदेश डायरेक्टरी ऑफ जिऑलॉजि आणि उत्खनन तज्ज्ञांनी दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी शोधल्या आहेत. सरकारने गोल्ड डिपॉझिट उत्खननासाठी भाडे तत्वावर देण्याचे ठरवले आहे. सोन्याच्या खाणी सोनपहाडी आणि हरदी येथे सापडल्या आहेत. जीएसआयने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोनपहाडी येथे २७०० मिलियन टन आणि हरदी येथे ६५० मिलियन टन सोनं असण्याची शक्यता आहे अशी माहिती जिल्हा मायनिंग अधिकारी के. के. राय यांनी दिली. तसेच सोनभद्रमध्ये युरेनियमचेही साठे असण्याची शक्यत आहे. त्याच्या शोधार्थ उत्खनन सुरू आहे.
सोनभद्रच्या कोन तालुक्यातील हरदी आणि दुध्धी तालुक्यातील महुली या दोन गावातील डोंगराळ प्रदेशात सोनं सापडलं आहे. हरदी येथे तब्बल 646.15 किलो इतकं तर महुली येथे 2943.25 किलो इतकं सोनं सापडलं आहे. या सोन्याचा ई-निविदा मागवून लिलाव केला जाणार आहे. यासाठी क्षेत्राचं टॅगिंग करणं गरजेचं असल्याने सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment