पुणे – राज्यात लांबलेल्या पावसाचा फटका लाल मिरचीला बसला आहे. मिरच्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, काही ठिकाणी माल भीजून दर्जा खालावला आहे. त्यामुळे लाल मिरची “तिखट’ बनली आहे. बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने मागील 10 दिवसांत घाऊक बाजारात क्विंटलच्या भावात 2,000 ते 2,500 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर, किरकोळ बाजारात किलोमागे तब्बल 40 रुपयांनी भाव वधारले आहेत. ब्याडगी मिरची तब्बल 175 ते 200 रुपये प्रतिकिलो इतकी झाली आहे.
मिरचीचे व्यापारी वालचंद संचेती म्हणाले, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राज्यासह देशभरात लाल मिरच्यांचा तुटवडा जाणवत आहे.
सर्वाधिक नुकसान कर्नाटकात झाले आहे. त्यामुळे आता पाऊस थांबला तरी पिकाचे तसेच मालाचे प्रचंड नुकसान झाल्याने येत्या काळातही तुटवडा कायम असणार आहे. त्यामुळे भावही तेजीत असणार आहेत. मिरच्याचे भाव वाढल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या गोष्टीचे भावही वाढणार आहेत. आंध्र प्रदेशातील शीतगृहांमध्येही मिरचीच्या मालाचे प्रमाण कमीच आहे. उत्पादन क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. पावसामुळे एकीकडे देशात मिरच्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे विदेशातून मागणी वाढली आहे. तसेच, राज्यासह देशातील मसाला उत्पादक कंपन्यांकडेही माल शिल्लक नसल्याने येत्या काळात विविध प्रकारच्या मसाल्यांचे भावही वाढणार आहेत.
दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष मिरचीचे व्यापारी राजेंद्र गुगळे आणि सोपान राख म्हणाले, यंदा मिरचीच्या उत्पादनात अगोदरच घट झाली होती. त्यातच अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मिरचीचे मोठे नुकसान झाले आहे. आवक प्रचंड घटल्याने भावामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही मिरचीच्या नुकसानीच.

0 comments:
Post a Comment
Please add comment